
दि.11/03/2026 रोजी आर के लॉ कॉलेज (भांडुप) तर्फे विद्यार्थ्यांसाठी विधानभवन visit आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रासाठी अभ्यासक्रमात असणाऱ्या constitutional law या विषयासंबंधी राज्य कायदे बनवणारी राज्यातील सर्वोच्च संस्था असणाऱ्या विधान भवनात कसे कामकाज चालते हे पाहण्याची संधी मिळाली.प्राध्यापक श्री अविनाश सांगुर्डेकर ,प्राध्यापिका सौ.सविता परदेशी,प्राध्यापिका सौ.अक्षता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अथर्व मोरे, श्री निखिल शेर्लेकर यांच्या व्यवस्थापनाखाली प्रथम विधान परिषद व त्यानंतर विधान सभेच्या कामाचा आढावा घेता आला.विधान परिषदेतील गृहविभागासंबंधी अमली पदार्थ विषयावरील चर्चा तसेच विधान सभेतील महसूल विभागासंबंधी शेतकरी महामंडळ जमिनी संबंधातील चर्चा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी होती. विधानभवनातील पोलिस प्रशासन तसेच इतर कर्मचारी वर्गाच्या सहकाऱ्याने ही क्षेत्रभेट यशस्वीरित्या पार पडली.

