30 Years of Growth in Education

info@rklawcollege.com

Office timing : 7am to 3pm

» Recognized by the Bar Council of India
» Approved by Maharashtra State Government
» Affiliated to the University of Mumbai
» AISHE code - Law college : C-76198

“Cyber Awareness” या विषयावर मुंबई पोलिसांचे मार्गदर्शनपर व्याख्यान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

 
मुंबई (भांडुप) सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळच्या आर.के.लॉ कॉलेज भांडुप-७८ येथे “Cyber Awareness” या विषयावर मुंबई पोलिसांचे मार्गदर्शनपर व्याख्यान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर क्राईमला निवृत व जेष्ठ नागरिक बळी पडत आहेत त्यामुळे सायबर क्राईम बाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याने संचालक रिद्धेश खानविलकर यांच्या विनंती नुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज गायकवाड ,गणेश बागुल, पूर्व उपनगर विभाग सायबर पोलिस स्टेशन, शिवाजीनगर,गोवंडी, मुंबई यांनी विद्यार्थ्याना डिजिटल अरेस्ट, सोशल मीडिया स्कॅम, नोकरी संबंधी ऑनलाइन स्कॅम, ऑनलाइन खरेदी विक्री स्कॅम,फेक लिंक्स, फेक पीडीएफस् इत्यादि गुन्ह्यासंबंधी माहिती दिली. तसेच असे काही गुन्हे घडल्यास खबरदारी कोणती घ्यावी ? या विषयी देखील विद्यार्थ्याना व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
असे गुन्हे आपल्या सोबत व आपल्या संबंधितांसोबत घडल्यास उपाय म्हणून १९३० हा हेल्पलाईन क्रमांक व cybercrime.gov.in या संकेतस्थळाविषयी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नउत्तराचे सत्र घेण्यात आले व विद्यार्थ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून शंकांचे निरसन केले.
सदर व्याख्यान आर.के.लॉ कॉलेजचे संचालक रिद्देश खानविलकर,यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक शिवानंद शेट्टी, प्राध्यापिका अक्षता पवार व विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडले.आर. के. लॉ कॉलेजच्या वतीने ईशान्य मुंबईत सायबर क्राइम जनजागृती मोहीम राबविण्याची सुरुवात झाली आहे.