पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांचा ८१ वा वर्धापन दिन सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नरिमन पॉईंट, मुंबई या ठिकाणी ८ जुलै २०२६ रोजी पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय मा.श्री. जिष्णु देव वर्मा राज्यपाल: महाराष्ट्र राज्य तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉ. रामदासजी आठवले साहेब चेअरमन-पीपल्स एज्युकेशन सोसायटी व (केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण-भारत सरकार), पद्मश्री खासदार ॲड. उज्वल निकम उपस्थित होते.
ज्ञानदान, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सन्माननीय श्री. रमेश श्रीराम खानविलकर सर यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार-२०२६” देऊन गौरविण्यात आले.


