
मुंबई .भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे आर. के. विधी महाविद्यालयाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री ना आशिष शेलार यांच्या शुभ हस्ते झाले . उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री आशिष शेलार म्हणाले की , ईशान्य मुंबई मध्ये विधी महाविद्यालय सुरू करून एक चांगले प्रेरणादायी काम करत आहात.विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून कायद्याचे ज्ञान देण्याचे चांगले काम करत आहेत.असेच ज्ञानार्जनाचे चांगले कार्य करत रहा.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश खानविलकर,संचालक श्री रिद्धेश खानविलकर,प्राध्यापक रुपेश तांबे ,निखिल शेर्लेकर उपस्थित होते.

