दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आर.के लॉ कॉलेज, भांडुप (प.) च्या वतीने ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वि. वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो.
या वर्षीची संकल्पना ” घेऊया एकच वसा मराठीला बनवू या ज्ञानभाषा ” ठरवण्यात आली होती.त्या अनुषंगाने प्रोफेसर अक्षता पवार यांनी प्रस्तावना देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थी संदीप माने,वैभव सैद, अजय बाबर,निलेश आचरेकर, स्नेहल शेडगे,आरती तेलंग,संतोष बांगर यांनी काही कविता,लेख सादर केले.त्याच सोबत मराठी हस्ताक्षर स्पर्धा,भाषे संबंधित छायाचित्रे,मराठी भाषेसंबंधी चर्चा सत्रे घेण्यात आली. कार्यक्रमाची सांगता भारतमातेची विनवणीया कवितेच्या वाचनाने झाली.




